गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

आरुषी हत्याकांड प्रकरणात तलवार दाम्पत्य निर्दोष - १३ ऑक्टोबर २०१७

आरुषी हत्याकांड प्रकरणात तलवार दाम्पत्य निर्दोष - १३ ऑक्टोबर २०१७

* संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी आणि गुन्हेगारी विश्वातील एक रहस्य बनलेल्या ९ वर्षांपूर्वीच्या आरुषी तलवार आणि हेमराज दुहेरी खूनप्रकरणी अलाहाबाद न्यायालयाने सबळ पुराव्याच्या अभावी आरुषीचे आई - वडील राजेश व नुपूर तलवार यांची मुक्तता केली.

* तलवार दाम्पत्यांच्या नोएडा येथील निवासस्थानी मे २००८ रोजी आरुषी तिच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

* गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. याबाबत सुरवातीस यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराजच्या दिशेने होती. पण त्याचा मृतदेहही घराच्या टेरेसवर आढळून आला होता. त्यामुळे सर्व संशय तलवार दाम्पत्यावर आला होता.

* त्यानंतर सीबीआय न्यायालयाने तलवार दाम्पत्यास आरुषी आणि हेमराज खूनप्रकरणी २६ नोव्हेम्बर २०१३ रोजी दोषी ठरवले होते. पण आता त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.