शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

केंद्र सरकारद्वारे ३ लाख लोकांना जपानमध्ये प्रशिक्षण - १५ ऑक्टोबर २०१७

केंद्र सरकारद्वारे ३ लाख लोकांना जपानमध्ये प्रशिक्षण - १५ ऑक्टोबर २०१७

* केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत ३ लाख भारतीय तरुणांना ३ ते ५ वर्षासाठी जपानला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी दिली.

* संबंधित प्रशिक्षणाचा खर्चही जपान उचलणार आहे. त्यामुळे त्यातील काही तरुणाना जपानमध्येच संधी मिळणार आहे.

* कौशल्य विकास मंत्रालयाने या संदर्भातील मांडलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. १६ ऑक्टोबरला टोकियोमध्ये या करारावर दोन्ही देशाकडून स्वाक्षरी करण्यात येणार आहे.

* टेक्निकल इंटर्न ट्रेनींग प्रोग्रॅम [टीआयपीपी] हा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम असून त्याअंतर्गत तीन लाख भारतीय तरुणाना जपानमध्ये प्रशिक्षण आणि नोकरीची संधी देण्यात येणार आहे.

* हा कालावधी साधारणतः ३ ते ५ वर्षाचा असणार आहे. असेही माहिती केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी दिली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.