रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

राज्यात २०१७ पावसाची १००% कामगिरी - २ ऑक्टोबर २०१७

राज्यात २०१७ पावसाची १००% कामगिरी -  २ ऑक्टोबर २०१७

* राज्यात चार महिन्यात पावसाने १००% कामगिरी केली आहे. हा पाऊस मात्र सर्वत्र सारख्या प्रमाणात पडलेला नसून कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४% अधिक तर विदर्भात सरासरीच्या २३% कमी पाऊस पडला.

* देशभरात सरासरी ९५ ते ९६ टक्के पाऊस झाला असून मोसमी वाऱ्यांनी आता परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. मोसमी वाऱ्यांनी राजस्थाना मधून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून सध्या दक्षिण भारतात मोसमी वारे सक्रिय आहेत.

* तांत्रिकदृष्ट्या १ जून ते ३० सप्टेंबर हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पावसाचा काळ समजला जातो. जागतिक हवामानाची मे महिन्यातील स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय हवामानशास्त्र सांगितल्या प्रमाणे मध्य भारतात १००% पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

* तसेच देशभरात ९८% पावसाची शक्यता करण्यात आली होती. पण ३० सप्टेंबर पर्यंत देशात सरासरीच्या ९५ ते ९६ पाऊस पडल्याचे दिसत आहे.

* राज्यात दरवर्षी सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस पडतो. या वेळी ३० सप्टेंबरपर्यंत १००६ मिली पाऊस पडला. विदर्भातील नागपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यात पावसाने ओढ दिली.

* अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया येथे ७० टक्के पाऊस झाला. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, व नांदेड येथे ७०ते ८० टक्के पाऊस झाला.

* राज्यात गेल्या वर्षी पावसाने सरासरीपेक्षा ११% अधिक कामगिरी केली होती. त्याआधी २०१४ व २०१५ मध्ये राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती होती.

* राज्यातील वर्षे व पावसाची कामगिरी २०१७ - १००%, २०१६ -१११%, २०१५ - ७५%, २०१४ - ८५% होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.