मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

बहुप्रतीक्षित अँपल कंपनीचे आयफोन X,८ फोन सादर - १३ सप्टेंबर २०१७

बहुप्रतीक्षित अँपल कंपनीचे आयफोन X,८ फोन सादर - १३ सप्टेंबर २०१७

* आयफोन च्या दशकपूर्तीनिमित्त अँपलने बहुप्रतीक्षित आयफोन x हा मास्टरपीस फोन लॉन्च केला. त्यासोबत आयफोन ८ व आयफोन ८ प्लस, अँपल वॉच ३ सिरीज, अँपल ४k टीव्ही, अँपल सेट टॉप बॉक्स सादर करण्यात आले.

* अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये हा भव्य लॉन्चिंग सोहळा पार पडला. अँपलचे सीईओ टीम कुक यांनी या शानदार सोहळ्यात हे फोन लॉन्च केले. हे तिन्ही फोन वायरलेस चार्जरने चार्ज होतील.

* आयफोन ८ आणि ८ प्लस ६४ हजारांना मिळणार असून तो २९ सप्टेंबर पासून भारतात लॉन्च होणार. आयफोन x हा ६४ जीबी चा फोन ८९ हजाराचा तर २५६ जीबीचा १ लाख २ हजार रुपयाच्या घरात आहे. हे फोन ३ नोव्हेंबरला भारतीय बाजारात तो उपलब्द होईल.

* आयफोन८ - ६४ जीबी ६४ हजार, आयफोन८ - २५६ जीबी ७७ हजार, तर आयफोन८ प्लस - ६४ जीबी ७३ हजार, आयफोन८ प्लस ८६ हजार रुपये, आयफोनX ६४ जीबी - ८९ हजार, आयफोन X २५६ जीबी - १ लाख २ हजार रुपये.

[ आयफोन X ची वैशिट्ये ]

* फेस रेकग्निशन अनलॉक फिचर - म्हणजे तुमचा चेहरा हा फोन लॉक-अनलॉक करू शकतो. या फोनमध्ये होम बटन नाही. चेहरा ओळखून तुमचा फोन बंद चालू होईल.

* वायरलेस चार्जिंग सुविधा आता चार्जर चिंता नाही.

* व्हिडीओ कॅमेरा ४k ६० fps व्हिडीओ शूट करतो. हे फिचर असलेला जगातील पहिला फोन.

* वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स म्हणजेच पाणी आणि धुळरोधक.

* जगातील आतापर्यंतचा सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि प्रगत असा हा आयफोन आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.