सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान [PMSMA] - १८ सप्टेंबर २०१७

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान [PMSMA] - १८ सप्टेंबर २०१७

* गर्भवती महिलांसाठी २०१६ मध्ये पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान [PMSMA] ही नवी आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे माता व शिशु मृत्युदर कमी करता येऊ शकतो.

* युनिसेफच्या नुसार ५५००० पेक्षा जास्त गर्भवती महिला प्रसूतीच्यावेळी मृत्यू पावतात. याला वेळोवेळी मेडिकल चिकित्सा करून हे थांबविले जाऊ शकते म्हणून या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

[ अभियानाचा उद्देश ]

* गर्भवती महिलांसाठी चांगले आरोग्य आणि स्वतंत्र तपासणी प्रदान करणे.
* मातृत्व मृत्युदर कमी करणे.
* गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याचा समस्या आणि परिस्थितीबाबत जागरूक करणे.
* मुलांचे निरोगी जीवन आणि सुरक्षित प्रसूतीची खात्री करणे.

[ योजनेची प्रमुख वैशिट्ये ]

* ही योजना फक्त गर्भवती महिलांना लागू राहील.
* प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य तपासणी पूर्णपणे मोफत असेल.
* या योजनेनुसार सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी पूर्णपणे मोफत असेल.
* तपासण्या वैद्यकीय केंद्रे, सरकारी आणि खासगी रुग्णालयात केल्या जातील.

[ योजनेचा लाभ व पात्र लाभार्थी ]

* [ग्रामीण भागात] - प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक स्वास्थ केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, मेडिकल कॉलेज.  [शहरी भागात] - शहरी रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्र, प्रसूतिगृहे.

* हि योजना फक्त गर्भवती महिलांसाठी लागू आहे. गर्भावस्था ३ ते ६ महिन्यात महिला या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्यास पात्र असतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.