शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ [NPCI] - २२ सप्टेंबर २०१७

भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ [NPCI] - २२ सप्टेंबर २०१७

* भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ [NPCI - National Payment Corporation of India] एकविसाव्या शतकात इलेक्ट्रॉनिक बँकिंगने प्रचंड गती घेतली. प्रगत तंत्रज्ञानावर कोर बँकिंग सोल्युशन कार्यप्रणाली तमाम सर्व बँकांनी स्वीकारली.

* संगणकीय सर्व बदल बँकर्स लोकांना नवीन होते. वाढणारा कामाचा व्याप, पसारा, विविधता, जबाबदारी आणि देशभरात कोठूनही सर्व व्यवहार, या सर्वांची सांगड घालणारी सक्षम यंत्रणा आवश्यक होती.

* त्यासाठी आरबीआयने Board for Regulation and Supervision of Payment and Settlement Systems [BPSS] ची स्थापना २००५ मध्ये केली. तसेच अम्ब्रेला NPCI ऑर्गनायझेशनची स्थापना करू शकतो.

* २००९ पासून देशभरातील कानाकोपऱ्यात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहारांचे ऑथोरायझेशन, एटीएम्स, व्यवहारासाठी [NFS-National Financial Swtich] यांची जबाबदारी NPCI ने स्वीकारली.

* NPCI हे एक हब आहे. ज्याचे मार्फत इलेक्ट्रॉनिक बँकिंग कार्यप्रणालीमधील सर्व प्रकारे होणारे देवाण घेवाण व्यवहार केले जातात. यात विविध बँकिंग प्रॉडक्ट, सर्व्हिस प्रोव्हायडर, विविध टेक्नॉलॉजी प्रकार, बँक ग्राहक वापरत असलेले एटीएम्स NEFT/RTGS/ECS/IMPS/NECS/UPI/Ru-PAY/BHIM/AEPS/CTS इत्यादीचा समावेश होतो.

* जलद गतीने होणाऱ्या मोठमोठ्या रकमांचे व्यवहार पूर्णत्वास नेताना NPCI चा वाटा मोलाचा आहे. त्याचे मुख्य कार्यालय मुंबईला आहे.

* NEFT - National Electronic Fund Transfer.
* RTGS - Real Time Gross Settlemnet.
* ECS - Electronic Clearing Service
* IMPS - Immediate Mobile Payment Service
* NECS - National Electronic Clearing Services
* UPI - Unified Payment Interface
* BHIM - Bharat Interface For Money
* AEPS - Adhar Enbled Payment System
* CTS - Cheque Truncation Scheme
* *99# - payment system through ordinary mobile
* BBPS - Bharat Bill Payment System

* या सेवेविषयी सर्व बँकांना नाविन्यपूर्ण कार्यप्रणालीसाठी हक्काचे आपले असे कोणीतरी मार्गदर्शन करणारे हवे होते. NPCI त्यापैकी एक आहे.

* कॅशलेस, डिजिटल, पेपरलेस, इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारामध्ये कागदाचा वापर अत्यल्प होतो. अशा बँकिंगचे फायदे खूप होतात. त्याचा स्वीकार करायला हवा. ह्या गोष्टी सहज उपलब्द पटणाऱ्या -Acceptable, परवडणाऱ्या - Affordable, देखील आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.