बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

MPSC घोषणापत्र - पात्रता गुणांच्या सीमारेषेत [कँटॉफ] बदल - २७ सप्टेंबर २०१७

MPSC घोषणापत्र - पात्रता गुणांच्या सीमारेषेत[कँटॉफ] बदल - २७ सप्टेंबर २०१७

* विषय - पूर्व परीक्षेच्या निकालाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी निवडावयाच्या उमेदवाराच्या प्रमाणात सुधारणा करणे.

* सध्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी उमेदवाराची निवड करताना साधारणतः पदसंख्येच्या १२ पट उमेदवार अंतिमतः पात्र होतील अशा रीतीने गुणांची सीमारेषा [Cut Off Line] ठरविली जाते.

* त्याऐवजी पदसंख्येच्या १५ ते १६ उमेदवार पात्र होतील अशा रितीने गुणांची सीमारेषा [Cut Off Line] निश्चित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

* त्यासाठी स्थायी आदेश काढले असून कार्यनियमावलीत आवश्यक सुधारणा यथावकाश केल्या जाणार आहेत.

* यामुळे लाखोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना थोड़ा दिलासा मिळणार असून, पूर्व परीक्षेतील पूर्व परीक्षेचा टप्पा पार करून मुख्य परीक्षा देण्याची संधी अधिक मिळणार आहे.

* अनेकदा पूर्व परीक्षेत अगदी काठावर पात्र ठरलेले उमेदवार पुढील टप्प्यावर खूप चांगली कामगिरी करताना दिसतात. अधिक उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळावी. या हेतूने पात्रतेचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे एमपीएससी चे अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांनी सांगितले.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.