बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

देशात पतंजली उद्योगसमूह श्रीमंताच्या यादीत ८ व्या स्थानावर - २८ सप्टेंबर २०१७

देशात पतंजली उद्योगसमूह श्रीमंताच्या यादीत ८ व्या स्थानावर - २८ सप्टेंबर २०१७

* श्रीमंत भारताच्या यादीत योग गुरु रामदेव बाबा यांचे सहकारी, पतंजली चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण आणि डीमार्टचे राधाकिशन दमाणी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

* या यादीत मुकेश अंबानी प्रथम स्थानी असून,अशी माहिती ६ वर्षांपासून श्रीमंतांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या हुरन या संस्थेने दिली आहे.

* रिटेल क्षेत्रातील दमाणी यांनी उत्तुंग झेप घेत श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या संपत्तीत ३२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

* पतंजलीचे बाळकृष्ण हे गेल्या वर्षी २५ व्या स्थानी होते तर ते आता आठव्या स्थानावर आले आहे. त्यांच्या संपत्तीत ३२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

* गेल्या वर्षी पतंजलीच्या कारभार १० हजार कोटींचा पोहोचला होता. ही कंपनी अनेक बड्या परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.