सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

नागपूर हैद्राबाद अतिवेगवान रेल्वेचा आराखडा तयार - ११ सप्टेंबर २०१७

नागपूर हैद्राबाद अतिवेगवान रेल्वेचा आराखडा तयार - ११ सप्टेंबर २०१७

* महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि मोत्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हैद्राबाद यामधील अंतर ९ तासावरून केवळ ३ तासावर आणण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली आहे.

* नागपूर आणि हैद्राबाद ही शहरे जोडण्याच्या अतिवेगवान रेल्वेचा आराखडा तयार केला आहे. रेल्वे मंत्रालयाने वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

* हा मार्ग प्रत्यक्ष आणण्याबाबतचा अभ्यास सुरु आहे. यासाठी रशियाच्या रेल्वे मंडळाची मदत घेतली जाणार आहे. सर्व अभ्यास पूर्ण झाल्यावर मंजुरीसाठी हा प्रस्ताव भारतीय रेल्वे मंडळाकडे पाठविला जाणार आहे.

* नागपूर आणि हैद्राबाद सध्या थेट विमानसेवा नाही. या गोष्टीचा फायदा उठविण्याचा विचार आहे. या दोन शहराचे अंतर कापण्यासाठी रेल्वेला ९ तास लागतात.

* नव्या मार्गासाठी सध्याचे लोहमार्ग सुधारणे, संरक्षक कुंपण बसविणे, असे बदल करावे लागणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.