मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

विश्व शॉटगन नेमबाजी स्पर्धेत अंकुर मित्तलला रौप्य - ६ सप्टेंबर २०१७

विश्व शॉटगन नेमबाजी स्पर्धेत अंकुर मित्तलला रौप्य - ६ सप्टेंबर २०१७

* भारताचा नेमबाज अंकुर मित्तल याने मंगळवारी आयएसएसएफ विश्व शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक जिंकले.

* ज्युनिअर गटात १७ वर्षाचा अहवर रिझवी हा याच प्रकारात रौप्य जिंकण्यात यशस्वी ठरला. मित्तलने ६६ गुणांची कमाई करत अखेरच्या क्षणी मुसंडी मारली.

* ६८ गुणांसह त्याने सुवर्ण जिंकले त्याआधी मित्तलने पात्रता फेरीत १४५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. संग्राम दहिया पात्रता फेरीत १३५ गुणांसह २० व्या आणि मोहम्मद असब १३३ गुणांसह २३ व्या स्थानावर आला.

* या स्पर्धेत इटली संघ ६ सुवर्णासह एकूण ११ पदकासह आघाडीवर आहे. भारत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकासह चौथ्या स्थानावर आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.