शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

भारत आशियातील सर्वात भ्रष्ट देश फोर्ब्ज अहवाल - २ सप्टेंबर २०१७

भारत आशियातील सर्वात भ्रष्ट देश फोर्ब्ज अहवाल - २ सप्टेंबर २०१७

* फोर्ब्ज या मासिकाने भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे म्हटले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या अहवालाच्या आधारे फोर्ब्जने हा निष्कर्ष काढला आहे. 

[ अहवालातील प्रमुख मुद्दे ]

* पाकिस्तान, चीन, आणि बांगलादेशपेक्षाही भारतात अधिक भ्रष्टाचार आहे. भारतामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९% आहे. असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

* आशिया खंडामध्ये भ्रष्टाचाराची समस्या खूपच भयानक असून थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान, म्यानमार, व भारत या पाच देशामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूपच जास्त आहे. 

* या पाच देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला आहे. त्या खालोखाल व्हिएतनाम ६५%, थायलंड व पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो. पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा २०% कमी म्हणजेच ४०% आहे. 

* सर्व देशात शिक्षण आणि आरोग्यात भ्रष्टाचार अधिक असल्याचे आढळून आले. शाळाप्रवेश, रुग्णालये, पोलीस तसेच अन्य सुविधांसाठी आम्हाला लाच द्यावी लागते असे ५०% हुन अधिक लोकांना सर्व्हेमध्ये सांगितले आहे. 

* हा सर्वे तब्बल १८ महिने सुरु होता. त्यात आशिया खंडातील १६ देशातील विविध विभागात राहणाऱ्या लोकांना प्रश्न विचारण्यात आले. 

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधात चालविलेल्या प्रयत्नाबद्दल ५३ लोकांनी या सर्व्हेमध्ये समाधान व्यक्त केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.