शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास भाले यांची नियुक्ती - २४ सप्टेंबर २०१७

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास भाले यांची नियुक्ती - २४ सप्टेंबर २०१७

* डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २० व्या कुलगुरूपदी अकोल्यातील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ विलास मधुकरराव भाले यांची नियुक्ती झाली आहे.

* राज्यपाल व कृषी विद्यापीठाचे कुलपती सी विद्यासागर राव यांनी शनिवारी त्यांची नियुक्ती जाहीर केली. पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती केली आहे.

* डॉ रविप्रकाश दाणी यांच्यावर नागरिकत्वाच्या मुद्यावर राज्यपालांनी पदमुक्तीची कारवाई केली. सध्या परभणीचे कुलगुरू डॉ व्यंकटेश्वरलू यांच्याकडे येथील पदभार लवकरच डॉ भाले स्वीकारतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.