गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर - ८ सप्टेंबर २०१७

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर - ८ सप्टेंबर २०१७

* मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल विशेष टाडा न्यायालयाने आज जाहीर केला.

* या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या फिरोज खान आणि ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या यांना फाशीची, तर कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

* रियाज अहमद सिद्दीकी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष टाडा नायाधीश जी. डी. सानप यांनी स्पष्ट केले.

* पोर्तुगाल सरकारसोबत प्रत्यार्पण करारानुसार फाशीची शिक्षा ठोठावता येत  नसल्याने सालेमला जन्मठेप द्यावी अशी मागणी सीबीआयच्या मदतीने करण्यात आली.

* या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या मुस्तफा डोसा याचा काही दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.