सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

आयपीएल प्रसारणाचे जागतिक हक्क स्टारकडे - ५ सप्टेंबर २०१७

आयपीएल प्रसारणाचे जागतिक हक्क स्टारकडे - ५ सप्टेंबर २०१७

* स्टारने आयपीएल साठीचे टीव्ही आणि डिजिटल प्रक्षेपणाचे जागतिक हक्क १६ हजार कोटी रुपयाला विकत घेतले. स्टार कडे २०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठी हकक राहणार आहेत.

* याच स्टारकडे भारताच्या सामन्याच्या प्रक्षेपणाचेही हक्क आहेत. या दोन्हीची आकडेवारी पाहता आयपीएलचे सामने भारतीय सामान्यांपेक्षा महाग असल्याचे दिसून येते.

* स्टारने  ५ वर्षासाठी एकूण करार १६,३४७ कोटी हजार रुपयाला विकत घेतले आहे. एका वर्षासाठी ३२७० कोटी रुपये.

* भारताच्या सामन्यासाठी २०१२ ते २०१८ पर्यंतचा स्टारचा ३,८५१ कोटींचा करार. म्हणजेच एका सामन्यासाठी मोजले ४३ कोटी. आता आयपीएल एका सामन्यासाठी मोजणार ५५ कोटी रुपये.

* टीव्हीच्या हक्कासाठी स्टार आणि सोनी यांच्यातच स्पर्धा होती. मात्र डिजिटल हक्कासाठी रिलायन्स जियो, टाइम्स इंटरनेट, एअरटेल, फेसबुक हे दिग्गज स्पर्धेत होते. परंतु स्टारने सर्वावर मात करत डिजिटलचेही हक्क आपल्या ताब्यात घेतले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.