गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

जागितक बँक अहवाल २०१८ :लर्निग टू रिअलाइज एएज्युकेशन प्रॉमिस - २९ सप्टेंबर २०१७

जागितक बँक अहवाल २०१८ :लर्निग टू रिअलाइज एएज्युकेशन प्रॉमिस - २९ सप्टेंबर २०१७

* 'जागितक बँक अहवाल २०१८ :लर्निग टू रिअलाइज एएज्युकेशन प्रॉमिस' हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. जागतिक बँकेने शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाबाबत सादर केलेल्या अहवालामध्ये १२ देशांचा समावेश करण्यात आला आहे.

* अहवालातील मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

* भारतामध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन आकडी संख्येची वजाबाकी न येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

* अनेक विद्यार्थी लहान मजकुरातील एक शब्दही वाचू शकत नसल्याचे सांगत जागतिक बँकेने भारतीय शिक्षण क्षेत्रातील जळजळीत वास्तवाची पोलखोल केली आहे.

* शिक्षणाचा दर्जा खालावलेल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर पूर्व आफ्रिकेतील मालवी देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.

* दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला एक शब्दही वाचता येत नाही, आणि दोन अंकी संख्येची वजाबाकी येत नाही. यासाठी जागतिक बँकेने ७ देशांची यादी तयार केली आहे. यात भारत पहिल्या स्थानावर आहे.

* ग्रामीण भारतात इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन चतुर्थांश विद्यार्थ्यांना ४६ मधून १७ उणे केल्यास किती राहतात अशी साधी आकडेमोड जमत नाही.

* ५ वीतील निम्म्या विद्यार्थ्यांना ही आकडेमोड करता येत नसल्याचेही उघडकीस आले आहे.

* भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण जर लहान वयात विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर दारिद्र्य निर्मूलन आणि सर्वांसाठी सामायिक संधी आणि समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय अपयशी ठरेल.

* कित्येक वर्षे शाळेत जाऊनही लाखो विद्यार्थ्यांना वाचता अथवा लिहिणे तसेच मूलभूत गणित येत नाही. यावरून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा दर्जा स्पष्ट होतो. असे अहवालामध्ये म्हटले आहे.

* शैक्षणिक संकट हे नैतिक आणि आर्थिक संकट आहे. शैक्षणिक संकट निर्माण झाल्यामुळे सामाजिक दरी वाढते. जेव्हा शिक्षण चांगले दिले जाते त्या वेळी तरुण मुलांना नोकऱ्या उपलब्द होतात. चांगले उत्पन्न व आरोग्य चांगले राहते. लोक गरिबीशिवाय आयुष्य जगतात असे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी म्हटले आहे.

* शैक्षणिक संकट दूर करण्यासाठी विकसनशील देशांनी शिक्षणाचे ठोस धोरणात्मक मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. शैक्षणिक बदलासाठी चालना देणाऱ्या 'सर्वांसाठी शिक्षण' या अभियानावर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.