गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

जागतिक स्मार्टफोन विक्रीत अँपलची तिसऱ्या क्रमांकावर घसरण - ८ सप्टेंबर २०१७

जागतिक स्मार्टफोन विक्रीत अँपलची तिसऱ्या क्रमांकावर घसरण - ८ सप्टेंबर २०१७

* रिसर्च फर्म CounterPoint च्या रिपोर्टनुसार जागतिक बाजारात अँपलला मोठा धक्का बसला आहे. या अहवालानुसार चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी हुवेईन अँपलला मागे टाकले आहे.

* जून २०१७ च्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत हुवेईन जागतिक बाजारात जगात दुसऱ्या स्थानावर होती. तर सॅमसंग अजूनही पहिल्या स्थानावर आहे.

* ऑगस्ट महिना चिनी मोबाईलसाठी कंपन्यांसाठी चांगला ठरू शकतो. त्यामुळे पहिल्या स्थानावरील सॅमसंगला देखील आता जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे.

* CounterPoint चे संचालक पीटर रिचर्जसन यांच्या मते जागतिक बाजारपेठेत दुसरं स्थान पटकावणे हे हुवेईचे मोठं यश आहे. कंपनीची मेहनत आणि गुंतवणुकीचे हे फळ आहे. 

* या यादीत दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग पहिल्या स्थानावर आहे. चीनची हुवेई दुसऱ्या आणि अमेरिकेची अँपल तिसऱ्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.