शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

१ ऑकटोबर पासून आयसीसीचे नवीन नियम लागू - ३ सप्टेंबर २०१७

१ ऑकटोबर पासून आयसीसीचे नवीन नियम लागू - ३ सप्टेंबर २०१७

* आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्याच्या काही नियमामध्ये सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली होती.

* या नवीन नियमांना आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने काही महिन्यापूर्वीच मान्यता दिली आहे.

* त्यामुळे १ ऑकटोबर २०१७ पासून आयसीसीचे प्रत्येक क्रिकेट संघासाठी खालील नवीन नियम लागू होतील.

[ आयसीसीचे नवीन नियम ]

* एखाद्या खेळाडूने पंचाकडे फलंदाज पायचीत [LBW] असल्याचे अपील केले, आणि पंचानी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्यू घेताना जर, अम्पायर्स कॉल असा निर्णय आला तरीही तो संघ आपली [DRS] ची संधी गमावणार नाही. यायाधीच्या नियमाप्रमाणे तिसऱ्या पंचानी अम्पायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची [DRS] ची संधी संपून जायची.

* कसोटी सामन्यात यापुढे एका डावात ८० षटकानंतर [DRS] च्या नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या. वनडे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही [DRS] चा वापर करण्यात येणार आहे.

* नवीन नियमानुसार [DRS] मध्ये बॉल ट्रेकिंग आणि [ EDGEC DETECTION TECHNOLOGY ] या सुविधा अनिवार्य असणार आहेत.

* आयसीसीच्या नवीन नियमानुसार प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमी, खोली, ६७ मिमी तर बॅटची कडा ही ४० मिमी इतकी असणे बंधनकारक असणार आहे.

* फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूचे मैदानात पंचाशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे.

* १ ऑकटोबर पासून लागू करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार एखाद्या फलंदाजांची बॅट फ्रिजमध्ये पोहोचल्यानंतर जर हवेत उचलली गेली तरीही त्याला धावबाद [runout] ठरवता येणार नाही. मात्र स्टम्प्स उडत असताना फलंदाजांची बॅट क्रीजमध्ये नसेल तर तो बाद ठरवला जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.