गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

भारताचा डिजिटल निरक्षरता अहवाल - २९ सप्टेंबर २०१७

भारताचा डिजिटल निरक्षरता अहवाल - २९ सप्टेंबर २०१७

* स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठाना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्याच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष अहवाल [एजवेल फाऊंडेशन] च्या पाहणीतून काढण्यात आला आहे.

* या पाहणीत सहभागी झालेल्या ८५.८% नागरिक डिजिटल व संगणक निरक्षर असल्याचे आढळले. त्यात ज्येष्ठ पुरुषाचे प्रमाण ७६.५% तर महिलांचे प्रमाण ९५% आहे.

* ७५% लोकांनी सांगितले आहे की संगणक हाताळण्याच्या प्रशिक्षणाअभावी आणि डिजिटल निरक्षरतेमुळे वृद्धावस्थेत दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो.

* दोन पिढ्यातील वाढत जाणाऱ्या अंतरामुळे ज्येष्ठांच्या आयुष्यवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी या संस्थेने दिल्ली व एनसीआर परिसरातील ५ हजार जणांशी नुकताच संवाद साधला आहे.

* संगणक व डिजिटल यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी फारशा सुविधा उपलब्द नसल्याचा दावा ५१% जणांनी केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.