मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या - ६ सप्टेंबर २०१७

सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या - ६ सप्टेंबर २०१७

* सामाजिक कार्यकर्त्या तथा देशातील ज्येष्ठ पत्रकारापैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची आज बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

* रात्री ८ वाजताच्या सुमारास ३ ते ४ हल्लेखोरांनी गौरी यांच्या घरात घुसले आणि त्यांनी जवळून गोड्या झाडून त्यांची हत्या केली.

* ५५ वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमान पत्रामध्ये लिखाण करायच्या.

* त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्या प्रसिद्ध कन्नड कवी पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

* त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला, तसेच हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.