शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

चंद्रावरील पाण्याच्या पहिल्या नकाशाचा शोध - १५ सप्टेंबर २०१७

चंद्रावरील पाण्याच्या पहिल्या नकाशाचा शोध - १५ सप्टेंबर २०१७

* भारताच्या [चंद्रयान -१] या यानासोबत पाठविलेल्या आंतराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या नासा चंद्र खनिज मापकाने पाठविलेल्या नव्या माहितीच्या आधारे चंद्रावरील पाण्याचा नकाशा संशोधकांनी तयार केला आहे.

* ' सायन्स ऍडव्हान्ससेस ' या संशोधनपत्रात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. सुरवातीला २००९ मध्ये चंद्राच्या भूमीवर पाणी आणि पाण्याशी निगडित हायड्रोक्सिलचे रेणू सापडले होते.

* हायड्रोक्सिल मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रत्येकी एक अणू असतो. या संशोधनाचा आताच्या संसोधनासाठी आधार घेण्यात आला.

[ संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष ]

* या संशोधनाचे प्रमुख व ब्राऊन विद्यापीठातील संशोधक शुहाई ली म्हणले की चंद्राच्या ध्रुवीय भागात पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी इतर भूभागावर असलेल्या पाण्याचे प्रमाण तुलनेने सारखेच आहे.

* चंद्राच्या पृष्ठभागावर आधी म्हटल्याप्रमाणे पाण्याचे अंश केवळ ध्रुवीय भागातच नसून ते सगळीकडे आहेत.

* चंद्राच्या पृष्ठभागावर उंच ठिकाणी सापडणाऱ्या पाण्याचे प्रमाण पृथ्वीवरील अतिशय कोरड्या वाळवंटातील वाळूमध्ये सापडणाऱ्या पाण्याएवढे आहे. मात्र हे प्रमाण अगदीच नगण्य म्हणण्यासारखे नाही.

* चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर नेमके कोठे पाणी आहे. याची माहिती आता मिळाली आहे.

* ते आता अंतराळवीरांना पिण्यासाठी की इंधनासाठी योग्य असेल यावर संशोधन करावे लागेल. चंद्रावर सर्वत्र पाण्याचे समान वितरण झालेले दिसते.

* चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याची रचना पाहता त्यांच्या स्रोतांबाबत काही दुवे संशोधकांना मिळाले आहेत. ही सर्व रचना सौर वाऱ्यामुळे झाली आहे.

* सूर्याकडून प्रोटॉनचा सतत मारा झाल्याने हायड्रोक्सिलची निर्मिती झाली आहे. असे संशोधनात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.