गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

केंद्र सरकार करणार २० लाख नोकऱ्यांची भरती - २९ सप्टेंबर २०१७

केंद्र सरकार करणार २० लाख नोकऱ्यांची भरती - २९ सप्टेंबर २०१७

* केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. रेल्वेतच सुमारे २० लाख पदे भरण्यात येणार आहे.

* या मेगाभरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ राज्य सरकारेही नोकर भरती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा आहे.

* केंद्रीय कामगार मंत्रालयामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. आगामी तीन ते चार महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरु कारण्याबाबत सर्व केंद्रीय मंत्रालयांना निर्देश देण्याचे ठरले आहे.

* मंत्रिमंडळाचा आकार कमी ठेवून केंद्र व राज्ये तसेच सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याबाबत नीती अयोग गांभीर्याने विचार करत आहे.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.