रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्ब चाचणी - ४ सप्टेंबर २०१७

उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्ब चाचणी - ४ सप्टेंबर २०१७

* अमेरिका आणि उर्वरित जागतिक शक्तीच्या धमक्यांना भीक न घालणाऱ्या उत्तर कोरियाने आज सहावी अणू चाचणी घेतली असून, यामध्ये हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून आणल्याचा दावा करण्यात आला.

* या स्फोटानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेली कंपने पाहता ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अणू चाचणी असल्याचे मानले जात आहे.

* या चाचणीनंतर चीनसह जगभरातील देशांनी उत्तर कोरियाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्तर कोरियाने गेल्या वर्षी केलेल्या पाचव्या अणू चाचणीवेळी केलेल्या स्फोटापेक्षा ५ ते ६ पट मोठा आजचा स्फोट होता.

* आजच्या चाचणीमुळे अमेरिकेच्या भूमीवर परिणामकारक क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या आपल्या दिशेने उत्तर कोरियाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

* नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासाठी तयार केलेल्या हायड्रोजन बॉम्बची ही चाचणी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन यांच्या उपस्थितीत झाल्याचा दावाही या वाहिनीने केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.