शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

गुगल ट्रान्सलेटचा आणखी सात भाषांमध्ये अनुवाद - १६ सप्टेंबर २०१७

गुगल ट्रान्सलेटचा आणखी सात भाषांमध्ये अनुवाद - १६ सप्टेंबर २०१७

* सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अँपमध्ये आणखी सात भाषांचा समावेश केला आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये आता देशातील प्रमुख सात भाषांचा अनुवाद केला जाईल.

* ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अँपची सेवा सुरु केली आहे. त्यात बंगाली, गुजराथी, कन्नड, मराठी, तमिळ, तेलगू, व उर्दू या भाषांचा समावेश केला आहे.

* अँड्रॉइड व आयओएस स्मार्टफोन या अँपचा उपयोग करता येईल. ही सुविधा ऑफलाईन असणार आहे. म्हणजेच इंटरनेटनसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो.

* गुगल ट्रान्सलेट अँप तुम्हाला डाउनलोड करावे लागेल. या अँपद्वारे एखाद्या भाषेतील छापील मजकूराचाही अनुवाद करता येईल. यासाठी कॅमेरा त्या मजकुराच्या प्रतिमेवर ठेवावा लागेल. त्याचा अनुवाद फोनच्या स्क्रीनवर पाहता येईल.

* जर रस्त्याच्या इंग्रजीतील बोर्डाचा मजकूर या अँपच्या माध्यमातून हिंदी व अन्य भाषेत दिसू शकेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.