गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

प्लेबॉय मासिकाचे कर्ते ह्यू हेफनर यांचे निधन - २९ सप्टेंबर २०१७

प्लेबॉय मासिकाचे कर्ते ह्यू हेफनर यांचे निधन - २९ सप्टेंबर २०१७

* स्त्री सेलिब्रेटींच्या दिगंबर छायाचित्रांना कलात्मकतेची बैठक देणाऱ्या आणि जगामधील साहित्यातील नवमताचा आदर करणाऱ्या प्लेबॉय मासिकाचे कर्ते ह्यू हेफनर यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

* शिक्षक दाम्पत्याच्या पोटी १९२६ साली जन्मलेल्या ह्यू हेफनर यांनी शिक्षणानंतर सर्जनशील लेखनामध्ये उमेदवारी सुरु केली.

* १९५३ साली त्यांनी मेरेलिन मन्रोची नग्न छायाचित्रे आणि साहित्यिक मजकूर छापून पहिला अंक काढला. अंकाच्या काढण्यात आलेल्या ५० हजार प्रती हातोहात संपल्या. तेव्हाच प्लेबॉय या बंडखोर मासिकाचा जन्म झाला.

* बिनधास्त साहित्य, संगीत, समाज आणि राजकारणातील वृत्ती - प्रवृत्तीना तिरकस चावा घेणारी लेखणी प्लेबॉयमध्ये सहचित्र छापली गेली. शरीर संबंधाबाबत होणाऱ्या मुक्त विचारांना आपल्या मासिकाद्वारे प्रचार व प्रसार करण्यात आला.

* अमेरिकेत या मासिकाने लैंगिक क्रांती केली. जगभरात विक्रीच्या बाबतीत विक्रम केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.