रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

जगातील दुसऱ्या आणि भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या धरणाचे आज लोकार्पण - १७ सप्टेंबर २०१७

जगातील दुसऱ्या आणि भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या धरणाचे आज लोकार्पण - १७ सप्टेंबर २०१७

* तब्बल ५६ वर्षे रेंगाळलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण होणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजे आज लोकार्पण होणार आहे.

* सरदार सरोवर प्रकल्प हा भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मोठे धारण ठरले आहे. ५६ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सरदार सरोवरचे भूमिपूजन केले होते.

* याच प्रकल्पाच्या विस्थापित होणाऱ्या लोकांचे हक्क व मागण्यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले [नर्मदा बचाव आंदोलन] देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.

[ सरदार सरोवर प्रकल्पाची वैशिष्ट्ये ]

* अहमदाबाद पासून २०० किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. एका अंदाजानुसार तब्बल ५ लाख कुटुंबाना धरणामुळे विस्थापित व्हावं लागले.

* नर्मदा कंट्रोल अथॉरिटीच्या सूचनेनुसार ३० धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. पूर्वी धरणाची उंची १२१.९२ मीटर होती. आता १३८ मीटरपर्यंत वाढविण्यात आली होती.  धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मीटर्स इतकी आहे.

* धरणामुळे १८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, तसेच नर्मदेचं पाणी कालव्यातून ९ हजार गावामध्ये खेळवलं जाईल.

* धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा कालावधी लागतो. काँक्रीटच्या सर्वाधिक वापरामुळे सरदार सरोवर धरण चर्चेत आहे.

* अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठं धरण म्हणून सरदार प्रकल्पाच नाव घेतल जातं.

* या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७% वीज महाराष्ट्र, २७% वीज मध्य प्रदेश वापरणार आहे. तर ६% वीज गुजरात वपणार. १.२ किमी लांब धरणावरील प्रकल्पाने आजवर ४ हजार १४१ कोटी युनिट वीजनिर्मिती केली आहे.

* मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ धारणाच काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने २००० मध्ये पुन्हा हे काम सुरु करण्याचे आदेश दिलं.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.