गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ' विकास परिवार ' अभियानाला सुरुवात - ८ सप्टेंबर २०१७

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ' विकास परिवार ' अभियानाला सुरुवात - ८ सप्टेंबर २०१७

* आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने ५ सप्टेंबर २०१७ रोजी मिशन परिवार विकास नावाचे एक केंद्रीय कुटुंब नियोजन अभियान सुरु केले आहे.

* या अभियानाचे मुख्य लक्ष्य म्हणजे अधिकाधिक चांगल्या सेवा प्रदान करणे तसेच गर्भनिरोधक उपलब्द होण्यास सुधारणा करणे, यासंबंधी सुरक्षा सुनिश्चित करणे आणि उच्च गुणवत्तापूर्ण कुटुंब नियोजन सेवा चांगल्या करणे हे आहे.

* अभियानाचा मुख्य उद्देश वर्ष २०२५ पर्यंत एकूण प्रजनन दर २.१ पर्यंत खाली आणणे हा आहे. अभियानात  उच्च प्रजनन दर असणाऱ्या देशातल्या १४६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

* हे जिल्हे उच्च प्रजनन दर असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ आणि आसाम या सात राज्यामधील आहेत. जेथे देशातल्या एकूण लोकसंख्येपैकी ४४% लोकसंख्या वास्तव्य करते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.