सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

भारतात ६० लाख मुले शाळाबाह्य स्थितीत - २५ सप्टेंबर २०१७

भारतात ६० लाख मुले शाळाबाह्य स्थितीत - २५ सप्टेंबर २०१७

* देशातील एकही मूल शिक्षणाच्या प्रवाहात येण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा शिक्षण विभाग झटत असतानाच देशातील ६० लाख ६४ हजार २३० मुले शाळाबाह्य असल्याची माहिती अधिकारातून पुढे आले आहेत.

* यामधील महाराष्ट्रात १ लाख ४५ हजार ३२६ शाळाबाह्य मुले आहेत. उत्तर प्रदेश येथे सर्वाधिक १६ लाख १२ हजार, बिहारमध्ये ११ लाख ६९ हजार ७२२ असल्याचे समोर आले.

* केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय विभागाने माहितीच्या अधिकारात ही माहिती देण्यात आली.

* या माहितीत हिंदी भाषिक राज्यामध्ये शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक असून ईशान्येकडील राज्यात कमी असल्याचे आढळले आहे.

* केंद्रशासित प्रदेशात शाळाबाह्य मुलांची संख्या अतिशय कमी आहे. शाळाबाह्य मुलामध्ये प्रामुख्याने रस्त्यावर भीक मागणारी मुले, बांधकाम, खाणकाम, करणाऱ्या मजुरांची मुले, ऊसतोडणी कामगाराची मुले, आणि भटक्या विमुक्त जमातीमधील मुलांचा समावेश आहे.

* शाळाबाह्य मुलांचे प्रमाण उत्तरप्रदेश, आणि बिहारमध्ये सर्वाधिक आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये ही संख्या ६ लाख १ हजार ८६३ आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.