शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

जीएसटी परिषदेत दैनंदिन वापराच्या ३० वस्तू स्वस्त - १० सप्टेंबर २०१७

जीएसटी परिषदेत दैनंदिन वापराच्या ३० वस्तू स्वस्त - १० सप्टेंबर २०१७

* जीएसटी परिषदेची बैठक हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आली त्यानुसार अतिरिक्त २ ते ७ टक्क्याचा उपकर लागू करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेत तयार करण्यात आला.

*  या बैठकीत दैनंदिन वापराच्या सुमारे ३० वस्तूवरील जीएसटी च्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याचा सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

* मध्यम आकाराच्या कारवर अतिरिक्त २%, मोठ्या आकाराच्या कारवर अतिरिक्त ५%, तर एसयूव्हीवर अतिरिक्त ७%  उपकर सेस लागू केला जाईल. असे जेटली यांनी सांगितले.

* लहान आकाराच्या हायब्रीड किंवा पेट्रोल डिझेल कारवर कोणताही अतिरिक्त कर न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

* इडली डोसा या पिठापासून ते किचन गॅस लायटर यासारख्या दैनंदिन वापराच्या सुमारे ३०% वस्तूवरील करात कपात करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

* कर कमी करण्यात आलेल्या वस्तूमध्ये कस्टर्ड पावडर, धूप बत्ती, प्लॅस्टिक रेनकोट, रबर बँड्स, कॉम्पुटर मॉनिटर्स आदींचा समावेश आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.