रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

ऑलिम्पिक २०२० जपानमध्ये तर २०२४ फ्रांसमध्ये होणार - १८ सप्टेंबर २०१७

ऑलिम्पिक २०२० जपानमध्ये तर २०२४ फ्रांसमध्ये होणार - १८ सप्टेंबर २०१७

* २०१६ साली ब्राझीलच्या रिओ दि जानेरो या शहरात झालेल्या ऑलिम्पिकनंतर आगामी २०२० च्या ऑलिम्पिक खेळांचा मान जपानच्या टोकियो शहराला मिळाला आहे.

* यानंतर होणाऱ्या २०२४ मधील खेळांचे यजमानपद फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराला मिळणार आहे. याआधी पॅरिस शहराला मिळणार आहे. यापूर्वी १०० वर्षांपूर्वी १९२४ मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा खेळविल्या गेल्या होत्या.

* याशिवाय २०२८ च्या ऑलिम्पिक खेळाचे यजमानपद भूषविण्याचा मान अमेरिकेतल्या लॉसएंजिल्स या शहराला मिळाला आहे.

* ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी दोन्ही शहरांना आंतरराष्ट्रीय समिती १.८ दशलक्ष डॉलरचा निधी देणार आहे. या निधीमध्ये गरजेनुसार २ दशलक्ष डॉलरची वाढही केली जाऊ शकते.

* आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश हे आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.