शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

विशेष लेख - चीनमधील हुवास्की जगातील सर्वात सधन गाव - २४ सप्टेंबर २०१७

विशेष लेख - चीनमधील हुवास्की जगातील सर्वात सधन गाव -  २४ सप्टेंबर २०१७

* गाव म्हटल की प्रगतीपासून दुरावलेल्या भागाच चित्र आपल्यासमोर उभं राहत अनेक गावात तासनतास वीज नसते, पक्के रस्ते, सोयी सुविधा नसतात. अशी साधारणतः गावाची ओळख असते.

* चीनमधल्या जियांगसू प्रांतात हे गाव असून हुवास्की असं या गावाचं नाव असून ते चीनमधील सर्वात श्रीमंत आणि जगातील सर्वात सधन गाव ओळखले जाते. या गावाला 'सुपर व्हिलेज' असेही म्हटले जाते.

* शांघाय शहरापासून १३५ किलोमीटर दूर हे गाव आहे. या गावात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. या गावाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती.

* पण कम्युनिस्टच्या काळात गावाच्या प्रगतीने वेग धरला. गावातील सगळेच लोक सामूहीक शेती करतात. उत्पन्नातून येणारा फायदा सगळे वाटून घेतात. हा पैसा कोणा एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण गावाचा आहे असे हे लोक मानतात.

* एवढंच नव्हे तर या गावातील सगळीच घर एकसारखी आहे. घरांचा रंग, रचना एवढी एकसारखी पाहायला मिळते की इथे एखादा नवखा आला तर तो नक्कीच चक्रावून जाईल.

* द गार्डियन या गावाचे वृत्त दिले आहे की या गावातील प्रत्येक रस्त्यावर येथे राहणाऱ्या कुटुंबियांचे फोटो लावण्यात आले आहेत.

* या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या छोट्या मोठ्या गोष्टीची नोंद देखील ठेवली जाते. म्हणजे एका कुटुंबात किती सदस्य, त्याचे शिक्षण किती, गाड्या किती, फ्रिज, टीव्ही, मोबाईल या सर्व गोष्टीची नोंद ठेवली जाते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.