मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु नीती आयोग अहवाल - २० सप्टेंबर २०१७

देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु नीती आयोग अहवाल - २० सप्टेंबर २०१७

* रस्ते, वीज, सिंचन, अन वाहतूक यासारख्या पायाभूत सुविधांचे देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्याची माहिती नीती आयोगाच्या थिंक टॅंक अहवालात म्हटले आहे. 

* महाराष्ट्रात जवळपास ६ लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

* देशात एकूण ८ हजार ३६७ पायाभूत प्रकल्पाची कामे चालू असताना त्याची एकूण किंमत ५० लाख ५८ हजार ७२२ कोटी इतकी आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये १०९७ प्रकल्पाची कामे चालू असून त्याच्या खर्चाचा एकूण ११.८ % निधी एकट्या महाराष्ट्र राज्याचा आहे. 

* देशातील एकूण प्रकल्प व त्यावरील खर्चाच्या महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीमध्ये एफडीआय महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात सांगितले आहे. 

* देशातील पहिले पाच प्रमुख राज्य अनुक्रमे (पायाभूत प्रकल्प खर्च कोटीत) - महाराष्ट्र ५,९७,३९१, उत्तरप्रदेश ३,५४,४१९, अरुणाचल प्रदेश ३,१७,३१०, तामिळनाडू ३,१४,०६६, गुजरात २,९०,२२६  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.