शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

प्रख्यात लेखिका शिरीष पै यांचे निधन - ३ सप्टेंबर २०१७

प्रख्यात लेखिका शिरीष पै यांचे निधन - ३ सप्टेंबर २०१७

* सिद्धहस्त, लेखिका, पत्रकार संपादिका असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेल्या शिरीष पै वय ८८ यांचे मुंबईत निधन झाले.

* त्यांनी वडिलांच्या सोबतीने मराठा व नवयुग मध्ये साहित्यिक पुरवणीची जबाबदारी भक्कमपणे सांभाळली. त्यांच्या संपादकत्वाखाली या पुरवणीने एक वेगळी उंची गाठली.

* असंख्य हायकू [ अल्पाक्षरी ] जपानी हायकू हा काव्यप्रकार मराठी कवितेत आणण्याचे आणि तो रुजवण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यांनी रचलेले हायकू वाचकांमध्ये प्रसिद्ध होते.

* एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र, हे शिरीष पै यांची काही गाजलेली काव्यसंग्रह आहेत.

* यासोबत लालन बैरागन, हेही दिवस जातील, त्या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या. आजचा दिवस, आतला आवाज, अनुभवांती, प्रियजन हे ललित साहित्य, तसंच चैत्रपावली खडकचाफा, सुखस्वप्नं, कांचन बहार या कथासंग्रहातून शिरीष पै यांच्या लेखन सामर्थ्यातून कल्पना करून देते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.