रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

कोरियन ओपन सीरिजचे विजेतेपद पी व्ही सिंधूला - १८ सप्टेंबर २०१७

कोरियन ओपन सीरिजचे विजेतेपद पी व्ही सिंधूला - १८ सप्टेंबर २०१७

* पी व्ही सिंधूने कोरिअन ओपन विजेतेपद आपल्या नावावर करून कोरियन ओपन विजेतेपद जिंकणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू बनली आहे. तिने जपानच्या नोझेमी ओकुहामा सोबत २२-२-, ११-२१, २१-१८ अशा फरकाने मात दिली.

[ सिंधूची कामगिरी ]

* कोरिया ओपन सिरीज स्पर्धा जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला, यापूर्वी २०१५ मध्ये मुंबईकर अजय जयरामने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण तो चेन लॉँगविरुद्ध पराजित झाला होता.

* सिंधूचे हे यंदाचे दुसरे सुपर विजेतेपद. यापूर्वी तिने इंडिया ओपन सुपर सिरीज जिंकली होती. याशिवाय श्रीकांत दोनदा विजेता तर बी साई प्रणित एकदा विजेता.

* यंदा सर्वाधिक सुपर सिरीज जिंकण्याच्या स्पर्धेत सिंधू दुसरी. चीनची ताई झू यिंग तीन विजेतेपदासह आघाडीवर

* सिंधूचे हे एकंदरीत तिसरे सुपर विजेतेपद. गतवर्षी चायना ओपन सुपर सिरीज तर यंदा इंडिया ओपन.

* सर्वाधिक सुपर सिरीज विजेतेपदाच्या भारतीय क्रमवारीत सिंधू तिसरी, सायना नेहवाल १०, किदाम्बी श्रीकांत ४ थ्या स्थानावर आहे.

* ओकुहामाची सलग चौदा विजयानंतर पहिली हार तर या स्पर्धेत तिसरी हार. तिने ऑस्ट्रेलियन ओपन जागतिक स्पर्धेत ५ विजय मिळवले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.