गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना - २२ सप्टेंबर २०१७

सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना - २२ सप्टेंबर २०१७

* स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यांनंतर राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहुर्तावर नव्या संघटनेची घोषणा केली.

* रयत क्रांती संघटना असे खोत यांच्या संघटनेचे नाव असून प्रत्येक तालुक्यात पाच हजार याप्रमाणे महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात १७ लाख सदस्य करून माझ्या संघटनेची ताकद दाखवून त्यांनी गर्जना केली.

* शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद झाले.

* मंत्रिपदावर असतानाही शेतकऱ्यांच्या हिताची तसेच संघटनेशी सुसंगत भूमिका न घेणे असा ठपका ठेवत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.