सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

नरेंद्र मोदीकडून सौभाग्य योजनेचा प्रारंभ - २६ सप्टेंबर २०१७

नरेंद्र मोदीकडून सौभाग्य योजनेचा प्रारंभ - २६ सप्टेंबर २०१७

* प्रत्येक घरात वीज पोहोचविण्यासाठी [सौभाग्य योजना] राबविण्यात येणार आहे. देशात ४ कोटी कुटुंबे अजूनही अंधारात असल्याची खंत व्यक्त करताना आज या योजनेचे उदघाटन मोदींनी केले. 

* 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना-सौभाग्य' योजनेला असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. 

* देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत वीज जोडणी दिली जाणार आहे. जनगणनेच्या आधारावर ही सुविधा दिली जाणार आहे. 

* एकूण १६ हजार ३२० कोटींची ही योजना आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, ओडिसा, या राज्यातल्या जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत ५ एलईडी बल्प, पंखा, आणि सोलर पॉवर पॅक वाटले जाणार आहे. 

* [ योजनेची उद्देश ]

* प्रत्येक घरात वीज 
* शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा 
* रॉकेलला पर्यायी वस्तू उपलब्द करून देण्याचा प्रयत्न 
* आरोग्य क्षेत्रात सुधारणा 
* कम्युनिकेशन क्षेत्रात सुधारणा 
* सार्वजनिक सुरक्षेत सुधारणा 
* रोजगाराच्या संधी वाढणार 
* जीवनशैली उंचावण्याचा प्रयत्न विशेषतः महिलासाठी 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.