शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ३० सप्टेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ३० सप्टेंबर २०१७

* २०१५-१६ वर्षीचा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन राज्य पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला मिळाला आहे. उत्कृष्ट पर्यटन अनुकूल रेल्वे स्टेशन म्हणून उज्जैन रेल्वे स्टेशनला मिळाला आहे.

* केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ वर्षे एवढे केले आहे.

* केंद्र सरकारने [ अडॉप्ट ए हेरिटेज ] नावाची योजना सुरु केली असून त्याअंतर्गत देशातील पर्यटन स्थळे व जागतिक वारसा स्वच्छ व चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी कुठल्याही खाजगी कंपनीची नेमणूक केली जाईल.

* एका अहवालानुसार भारतात गुगल, भेल, एसबीआय सारख्याकंपनीमध्ये काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून अग्रस्थानी आहेत. त्यानंतर अमेझॉन, इंटेल यासारख्या संस्था आहेत.

* गुजरात राज्यातील कच्छच्या जवळ असलेले कांडला बंदराचे नाव आता [दीनदयाल पोर्ट ट्रस्ट] असे करण्यात आले आहे.

* अंगोला देशाचे जोआलो लोरेको हे नवनिर्वाचीत राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली.

* जर्मनी गोथे विद्यापीठात संशोधन करणारे मूळ भारतीय बिनेश जोसेफ यांना ऍडॉल्फ मेसर पुरस्कार जाहीर झाला आहे. रोगकारक जीवाणूंवरील संशोधनासाठी मेसर फाउंडेशन तर्फे दिला जाणारा या पुरस्काराची रक्कम तब्बल १९ लाख रुपये आहे.

* बीबीसीच्या जगातील प्रेरणादायी महिलांच्या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ला स्थान मिळाले आहे.

* निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे निवडणूक आयोगाने झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यावर ३ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे.

* २६ सप्टेंबर २०१७ रोजी 'INS तारासा' हे वॉटर जेट जहाज भारतीय नौदलात सामील करण्यात आले.

* फुटबॉलपटू दिएगो आर्मडो मॅराडोना आणि डॅनी अक्रॉची यांनी लिहिलेले 'टच्ड बाय गॉड : हाऊ वी वोन द मेक्सिको ८६ वर्ल्ड कप' पुस्तक प्रकाशित झाले.

* भारतीय महिला मुष्टीयोद्धा मेरी कॉम ही आगामी आयओसी ऍथलिट फोरमसाठी आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा महामंडळ [AIBA] प्रतिनिधी म्हणून निवडण्यात येणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

* उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले असून इराणने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र २ हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते.

* हिमाचल प्रदेश शासनाने २१ सप्टेंबर २०१७ रोजी पर्यटन स्थळासाठी आपली पहिली इलेक्ट्रिक बस सुरु केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.