शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

नासाचे कॅसिनी अंतराळ यान शनी ग्रहाजवळ नष्ट - १६ सप्टेंबर २०१७

नासाचे कॅसिनी अंतराळ यान शनी ग्रहाजवळ नष्ट - १६ सप्टेंबर २०१७

* अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन [NASA] च कॅसिनी हे अंतराळ संशोधन यान शुक्रवारी शनी ग्रहांजवळ नष्ट झाले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.२५ वाजता हे यान शनीजवळ नष्ट झाले.

* कॅसिनी या यानाने जवळपास २० वर्षे शनी ग्रहाची परिक्रमा करून, ग्रहावरील हालचालीचे फोटो नासाला पाठविले होते. १९९७ मध्ये हे यान अंतराळात पाठवण्यात आल होत.

* २००४ मध्ये या यानाने शनीच्या वलयाकृती कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर या यानाने आपल्या मोहिमेदरम्यान शनी ग्रहाचे ४ लाखापेक्षा जास्त फोटो काढले होते. तर या यानाने एकूण ४.९ अब्ज मैलाचा प्रवास करून अंतराळ मोहिमेतील सर्वात मोठी मोहीम फत्ते केली.

* या यानाने काढलेल्या फोटोमुळे शनी ग्रहावरील हालचालींचा अभ्यास करण्यात शास्त्रज्ञाना मदत झाली होती. शेवटच्या टप्प्यात या यानाचा वेग ताशी १ लाख २२ हजार किलोमीटर इतका होता.

* यानंतर हे यान शनीजवळ गेल्यानंतर नष्ट झाल. यान नष्ट झाल्यावर ८३ मिनिटांनी याची माहिती नासाला मिळाली. नासाच्या या मोहिमेत ऐकून २७ देशांचा सहभाग होता.

* तर मोहिमेवर आतापर्यंत ३.९ अब्ज डॉलर इतका खर्च झाला होता. नासासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी मोहीम असल्याचे मोहिमेचे प्रबंधक अर्ल मेज यांनी यानंतर बोलताना सांगितल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.