रविवार, १० सप्टेंबर, २०१७

राफेल नदालला २०१७ यूएस ओपनचे विजेतेपद - ११ सप्टेंबर २०१७

राफेल नदालला २०१७ यूएस ओपनचे विजेतेपद - ११ सप्टेंबर २०१७

* स्पेनच्या राफेल नदालने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर शानदार मात करून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

* ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत अव्वल टेनिसपटू असलेल्या नदालने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन वर ६-३, ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आपली जादू कायम ठेवली आहे.

* २०१३ नंतर राफेल नदालचे हे एकाच वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. राफेल नदालच कारकिर्दीतील आतापर्यंतच १६ ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

* याआधी राफेलने २०१०,२०१३,२०१७ च यूएस ओपन विजेतेपद आपल्या नावावर केले. तर केविन अँडरसन हा अमेरिकन ओपनच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारा गेल्या ५२ वर्षातील पहिला शिलेदार ठरला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.