मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

उत्तर कोरियावर यूएनचे निर्बंध - १३ सप्टेंबर २०१७

उत्तर कोरियावर यूएनचे निर्बंध - १३ सप्टेंबर २०१७

* संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध लागू करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिलीय. अमेरिकेने यासंदर्भात प्रस्ताव ८ दिवसापूर्वी सादर केला.

* त्यावर चर्चा केल्यावर सुरक्षा परिषदेच्या सर्व १५ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक २३७५ नुसार यापुढे उत्तर कोरियाला जगातून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा जवळपास बंद होणार आहे.

* सध्याच्या निर्बंधानुसार उत्तर कोरियाला अत्यावश्यक सेवापुरता कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो. आता त्यातही ३० टक्क्याची कपात करण्यात येणार आहे.

* उत्तर कोरियाला मिळणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा तर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. उत्तर कोरियातून होणाऱ्या निर्यातीवरही अभूतपूर्व निर्बंध घालण्यात आलेत.

* जगातील एकही राष्ट्र यापुढे उत्तर कोरियात तयार झालेला कपडा विकत घेता येणार नाही. त्यामुळे कपडा निर्यातीवर पूर्ण बंदी असेल.

* यामुळे दक्षिण कोरियाला ७६० दशलक्ष डॉलरचा फटका बसणार आहे. याशिवाय कुठल्या राष्ट्राशी संयुक्त विद्यमाने सुरु असलेले सर्व प्रकल्प तत्काळ थांबविण्याचे निर्देशही या प्रस्तावाद्वारे सर्व सदस्यांना देण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.