सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

ब्रिक्स परिषदेमधील [ जाहीरनामा ] ठळक घडामोडी - ५ सप्टेंबर २०१७

ब्रिक्स परिषदेमधील [ जाहीरनामा ]  ठळक घडामोडी - ५ सप्टेंबर २०१७

* ब्राझील, रशिया, भारत, चीन, आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स गटाने दहशतवाद विरोधात लढण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आव्हाहन केले.

[ जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे ]

* ब्रिक्स देशामधील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी प्रयत्न वाढविण्याचा निश्चय.

* आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरतानाच जागतिक शांतता आणि सुरक्षा जपण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे.

* एकतर्फी लष्करी हस्तक्षेप, आर्थिक निर्बंध आणि बळाचा वापर यांचा निषेध.

* जगात कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि सर्व प्रकारच्या दहशतवादांचा निषेध.

* मूलतत्वाचा प्रसार रोखण्याबरोबरच दहशतवादविरोधात लढण्यासाठी सर्वमान्य धोरण अवलंबविल्याचे जगातील सर्व देशांना आवाहन.

* दहशतवादी संघटनांना मिळणारा निधी रोखणे आणि त्यांच्या आश्रयस्थळावर कारवाई करणे ही सर्व देशांची जबाबदारी आहे.

* दहशतवादविरोधात प्रामाणिकपणे आणि गंभीरपणे काम करणारी आंतरराष्ट्रीय कारवाई करणे ही सर्व देशांची जबाबदारी आहे.

* दहशतवादविरोधात प्रामाणिकपणे आणि गंभीरपणे काम करणारी आंतरराष्ट्रीय आघाडी स्थापन करणे आणि यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या समन्वयक म्हणून भूमिकेला पाठिंबा देणे.

* ब्रिक्स देशांदरम्यान आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्यासाठी चीनकडून ७.६ कोटी डॉलर.

* ब्रिक्सच्या विकास बँकेसाठीही ४० लाख डॉलरची चीनकडून मदत.

* उत्तर कोरियाने घेतलेल्या अणुचाचणीचा ब्रिक्स देशाकडून निषेध. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.