बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी ऑगस्ट/सप्टेंबर - ७ सप्टेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी ऑगस्ट/सप्टेंबर - ७ सप्टेंबर २०१७

* अमेरिकेची पैगी व्हाइटसन नासाची अंतराळ संशोधक २८८ दिवस अंतराळात राहणारी पहिली अंतराळवीर बनली आहे. २८८ दिवस संशोधन करून ती आता वापस आली आहे.

*  मोदी सरकारने माजी सीबीआय प्रमुख आर के राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नेमणूक झाली आहे.

* पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी पाकिस्तान न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्रध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

* अश्विनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* डॉ एस पी त्यागराज यांना अलीकडेच तामिळनाडू सरकारचा एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी हेपटायसिस विषाणूच्या संसर्गावर बीवर व्हायरोहेप हे वनौषधींवर असलेले औषध तयार केले.

* निवृत्तीनंतर २ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या ४० वर्षीय फ्लॉयड मेवेदरने बॉक्सिंग जगातील सर्वात महागडा सामना जिंकला.

* ईकॉमर्स क्षेत्रात अमेझॉनला टक्कर देण्यासही गुगल आणि वॉलमार्ट यांनी ईकॉमर्स क्षेत्रात भागीदारी केली आहे. वॉलमार्ट आता व्होल मार्केट ही सुपरमार्केट साखळी ताब्यात घेण्याच्या टप्प्यात आहे. तर गुगलही ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात गुगल होम ब्रॅण्डच्या माध्यमातून विस्तार करत आहे.

* फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या महासचिवपदी संजय बारू यांची नियुक्ती करण्यात आली.

* नेपाळच्या काठमांडू येथे हिंदू धर्माची वैश्विक राजधानी बनण्याच्या उद्देशाने ३ दिवसीय आंतरराष्ट्रीय हिंदू सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.

* ग्रामीण क्षेत्रात खेळासाठी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार राष्ट्रपतीतर्फे फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना प्रदान करण्यात आला.

* राजस्थानच्या कोटाच्या चंबळ नदीवर बांधण्यात आलेल्या हँगिंग ब्रिजचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले या पुलाचा खर्च २०० करोड एवढा आहे.

* भारतीय लघु उद्योग विकास बँकच्या अध्यक्षपदी मोह्हमद मुस्तफा यांची नियुक्ती करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.