शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

भारतात महिलांचा मृत्युदर अमेरिकेपेक्षा ४० पटींनी जास्त - २ सप्टेंबर २०१७

भारतात महिलांचा मृत्युदर अमेरिकेपेक्षा ४० पटींनी जास्त - सप्टेंबर २०१७

* मारहाण, हिंसाचारामुळे भारतीय मृत्यूचे प्रमाण अमेरिकेतील महिलांच्या तुलनेत ४० पटींनी अधिक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

* मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्था [TISS] आणि अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठ आणि स्वीडनमधील
कॅरोलिन्स्का संस्था यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे

* दोन्ही देशामधील हिंसाचाराच्या घटनांच्या माहितीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यात हिंसाचारग्रस्त भारतीय महिलांवर योग्य वैद्यकीय उपचार होत नसल्याचे निदर्शनात आल्याचे संशोधकांनी सांगितले

* जोडीदाराने केलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पैकी फक्त एकाच महिलेवर उपचार होत असल्याने सिद्ध होत असल्याकडे या अभ्यासात लक्ष वेधले आहे

* अशा महिलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठीची व्यवस्था अमेरिकेप्रमाणे भारतात विकसित झालेली नाही

* यामुळे अल्प उत्पन्न गटातील महिलांना आवश्यक उपचारावर खर्च करणे शक्य होत नाही असेही संशोधकांनी म्हटले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.