सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

भारतीय बॅडमिंटन महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश पदुकोण यांना जाहीर - १२ सप्टेंबर २०१७

भारतीय बॅडमिंटन महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश पदुकोण यांना जाहीर - १२ सप्टेंबर २०१७

* भारतीय बॅडमिंटन महासंघाचा यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे.

* नवी दिल्ली येथे लवकरच एका समारंभात हा पुरस्कार दिला जाईल. असे महासंघाचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांनी ही माहिती दिली.

* बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारणीत जीवनगौरव पुरस्कार सुरु करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. पदुकोण यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

* अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते. १९७८ च्या राष्टकुल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. तर १९८३ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.