सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

जगात सर्वाधिक तणावाच्या शहरांच्या यादीत भारतातील ४ शहरे - १९ सप्टेंबर २०१७

जगात सर्वाधिक तणावाच्या शहरांच्या यादीत भारतातील ४ शहरे - १९ सप्टेंबर २०१७

* जगात सर्वाधिक आणि सर्वात कमी याच्यासाठी झालेल्या एका अहवालात जगातील पहिल्या २० शहरात ४ भारतीय शहरांचा समावेश आहे.

* सर्वाधिक तणाव असणाऱ्या पहिल्या २० शहरामध्ये भारतातील दिल्ली ९ व्या स्थानावर आहे. मुंबई १३ व्या, कोलकाता १९ व्या, तर बंगळुरू २० व्या स्थानावर आहे.

* जगात सर्वात कमी तणाव असणाऱ्या शहरामध्ये जर्मनीचे स्टुटगार्ड पहिल्या स्थानावर, लक्झेम्बर्ग दुसऱ्या स्थानावर तर हॅनोव्हर तिसऱ्या स्थानावर आहे.

* या अहवालात जगातील १५० हुन अधिक शहराचे अध्ययन केले आहे. मानसिक शांतता, बँकेतील जमा रक्कम आणि रोजगार सुरक्षितेच्या मुद्यावर जगात जर्मनी सर्वात चांगले ठिकाण आहे.

* पहिल्या १० सर्वात कमी तणावाच्या शहरामध्ये जर्मनीची ४ शहरे असून यात सिडनी हे एकमात्र शहर युरोपबाहेरील आहे.

* सिंगापूर आणि तैपेई येथील नागरिक सर्वाधिक समाधानी आहेत. वास्तव्यासाठी सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत अबुधाबी प्रथम क्रमांकावर आहे.

* अमेरिकेचे मियामी सर्वात कमी प्रदूषण असणारे ठिकाण आहे. लक्झेम्बर्ग मानसिक आरोग्याच्या निकषावर पहिल्या क्रमांकावर आहे. सॅन फ्रान्सिको समानतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.