मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय - १३ सप्टेंबर २०१७

केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय - १३ सप्टेंबर २०१७

* केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक टक्क्याने वाढविणे आणि करमुक्त ग्रॅज्युइटी मर्यादा दहा लाखावरून २० लाख रुपये करणाऱ्या दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

* दौड - मनमाड या २४७ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला आणि विद्युतीकरणाला मंजुरी यासाठी २०८१ कोटी खर्चाला मंजुरी.

* देशात दूध क्षेत्रात डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी उभारण्यासाठी १०,८०० कोटी रुपयाचा निधी उभारला जाईल. यामुळे ५० हजार खेड्यातील ९५ लाख शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

* भारत संचार निगम लिमिटेड [बीएसएनल] या सरकारी दूरसंचार कंपनीला स्वमालकीची मोबाईल टॉवर कंपनी स्थापन्याला मंजुरी देण्यात आली. सध्या देशात ४.४ लाख टॉवर असून त्यात बीएसएनएलची मालकी ६६% आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.