शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

केनेथ जस्टर यांची अमेरिकेचे भारतातील राजदूतपदी अमेरिकेकडून नियुक्ती - ३ सप्टेंबर २०१७

केनेथ जस्टर यांची अमेरिकेचे भारतातील राजदूतपदी अमेरिकेकडून नियुक्ती - ३ सप्टेंबर २०१७

* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे.

* भारतासोबत आर्थिक, व्यापारी, आणि मत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून ते वाढवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. हेच या निर्णयावरून दिसून येते आहे.

* केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेतून परराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात. रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यातच राजीनामा दिला होता.

* त्यानंतर भारतातील नवे अमेरिकन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

* केनेथ जस्टर २००१ ते २००५ पर्यंत अंडर सेक्रेटरी ऑफ कॉमर्स होते. १९९२-१९९३ या दरम्यात स्टेट डिपार्टमेंटमध्ये ऍक्टिंग कौन्सलर म्हणून राहिले होते.

* याशिवाय १९८९ ते १९९२ पर्यंत डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आता ते अमेरिकेचे भारताचे राजदूत म्हणून काम पाहतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.