बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

राज्यात मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन - १४ सप्टेंबर २०१७

राज्यात मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन - १४ सप्टेंबर २०१७

* मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्या व त्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे.

* या समितीत मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावतेचा समावेश आहे.

* मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आरक्षणाबरोबर समाजाच्या अन्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेली मंत्रीसमिती कार्यरत राहील.

* या समितीमुळे मराठा समाजाच्या सर्व मागण्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेस गती येणार आहे.
[ उपसमितीचे कार्य ]

* मराठा समाजातील सर्वच घटकांशी चर्चेसाठी बैठका घेऊन चर्चा करतील.
* मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आराखडा बनवणार.
* चर्चा करताना सर्व घटकांना सोबत घेणार.
* चर्चेतून नवीन मुद्दे आल्यास त्यांनाही प्राधान्य.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.