मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

माणिक भिडे यांना यंदाचा भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर - २७ सप्टेंबर २०१७

माणिक भिडे यांना यंदाचा भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर - २७ सप्टेंबर २०१७

* राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा २०१७-१८ या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे.

* या पुरस्कारासाठी ५ लाख रोख, मानपत्र, आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

* यापूर्वी गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं जसराज, प्रभा अत्रे, पं राम नारायण, परवीन सुलताना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

* [ माणिक भिडे जीवन परिचय ] *

* पंडिता माणिक भिडे यांचा जन्म १९३५ मध्ये कोल्हापुर येथे झाला. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास त्यांना प्रशिक्षण मिळाले.

* जयपूर - अत्रोली घराण्याचे आद्यपुरुष उस्ताद अल्लाउद्दीनखा यांचे पुत्र उस्ताद मजीखा यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंचे गुरु. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.