मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

जगात पावणेतीन कोटी मुले शाळाबाह्य युनिसेफचा निष्कर्ष - २० सप्टेंबर २०१७

जगात पावणेतीन कोटी मुले शाळाबाह्य युनिसेफचा निष्कर्ष - २० सप्टेंबर २०१७

* जगभरात सुमारे विविध भागात सुरु असलेला संघर्ष, वादामुळे सुमारे २ कोटी ७० लाख मुले शाळाबाह्य आहेत. यात मुलींना लैंगिक अत्याचार व लिंगभेदावर आधारित हिंसाचाराच्या धोक्याला सामोरे जावे लागले.

* जगातील ५ कोटी बेघर मुलांना शिक्षण देण्याची गरज आहे. हिंसाचार व असुरक्षिततेमुळे यातील २ लाख ८० लाख मुले घरातून पळून जातात.

* संघर्षांच्या छायेत असलेल्या २४ देशामधील प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळांमध्ये जाण्याच्या वयातील २ कोटी ७० लाख मुले जगात शाळाबाह्य आहेत.

* युनिसेफने २०१६ मध्ये आपत्कालीन परिस्थितीत १ कोटी १७ लाख मुळापर्यंत पोचून त्यांना शिक्षणाची संधी दिली. शिक्षण संचालक कॅनॉट वेट यांच्या नेतृत्वाखाली ११ कोटी ३० लाख डॉलर एवढा निधी सरकारी देणग्यांमधून जमा केला.

* अशा मुलांना शिक्षण देण्यासाठी निधी, कल्पकता व बांधिलकीची गरज आहे. प्रत्येक मूल शाळेत जाऊन शिकण्यासाठी आपण सर्वानी मिळून उपाय शोधले पाहिजेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.