शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

बीएसएनएल ५ जी चाचणी घेण्याच्या तयारीत - ९ सप्टेंबर २०१७

बीएसएनएल ५ जी चाचणी घेण्याच्या तयारीत - ९ सप्टेंबर २०१७

* भविष्यातील दूरसंचार  क्षेत्रातील डेटा आणि दरयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. रिलायन्स जियोच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशानंतर इतर कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे.

* आता मात्र सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड [ बीएसएनएल ] पुढील वर्षी मार्च महिन्यापासून मोबाईल जगतात क्रांती घडवून आणणाऱ्या ५ जी सेवेच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

* बीएसएनएलचे चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव म्हणाले की आम्ही पुढील वर्षी ५ जी सेवेची चाचणी घेणार आहो.

* त्यासाठी आता मोबाईल फोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या नोकियासोबत चर्चा सुरु आहे. चाचणीसाठी पूर्वतयारी झाली असून, मार्च २०१८ मध्ये या सेवेच्या चाचण्या घेण्यात येतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.